Soybean Crop : सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात; सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव

Nanded News : सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात; सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव
Soybean Crop
Soybean CropSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र सोयाबीन (Nanded) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीनवर (Soybean Crop) यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. (Maharashtra News)

Soybean Crop
Jalgaon News : एकाच दिवशी जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; कर्जबाजारीपणाचे ठरले कारण

नांदेड जिल्ह्यातील आर्धापुर तालुक्यातील लहान या गावातील शेतकरी केशव नादरे यांनी आपल्या 3 एकर शेतात सोयाबीन पेरले होत. परंतु ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनवर यलो मोझ्याक नावाचा रोग पडला. या रोगामुळे तीन एकरमधील सोयाबीन पिवळ पडल असून सोयाबीनच्या पिकाला एकही शेंग लागली नाही. त्यामुळे या (Farmer) शेतकऱ्याने तीन एकर मधील सोयाबीन काढून टाकलं आहे. 

Soybean Crop
Shahada News : शासकीय आश्रम शाळा भाड्याच्या खोलीत; पन्नास वर्षानंतरही हक्काची जागा नाही

पंचनामा करून भरपाईची मागणी 

शेतकऱ्यासोबतच जिल्ह्यात अकेन ठिकाणी सोयाबीनवर यलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. प्रशासनाने याचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com