Jalna Drought: जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता; मोसंबीसह अन्य फळबागा सुकल्या

Jalna Water Crisis : दरम्यान शासन स्तरावर याबाबत तात्काळ दखल घेऊन फळबागा वाचविण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेतकरी आर्थिक संकटात सापडेल असेही सांगितलं जात आहे.
loss of mosambi farm in jalna
loss of mosambi farm in jalna Saam Digital

- रामनाथ ढाकणे

मोसंबीसाठी अग्रेसर असणाऱ्या जालना जिल्ह्यातच आता मोसंबी, पेरू, डाळिंबसह इतर फळबागावरती शेतकऱ्यांनी दुष्काळाची कुऱ्हाड चालवल्याचे चित्र दिसून येतंय. एकीकडे दुष्काळाची दाहकता पसरल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे. त्याचाच फटका आता फळबागांना देखील बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा काढून टाकल्यात.

आधीच माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तर मग फळबागांना पाणी आणायचे कुठून आणि फळबागा वाचवायच्या तरी कशा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांबरोबरच विहिरींनी देखील आता तळ गाठल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.

loss of mosambi farm in jalna
Sindhudurg: विद्यूत वितरण कार्यालयात सावंतवाडीकरांनी अधिका-यांना घेरले;गुरुवारी बैठकीचे आश्वासन

त्यामुळे टँकरच्या पाण्यावरही काही फळबागा वाचवण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे. मात्र हा खर्च अधिक झाल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांवरती कुऱ्हाड चालवली. काही शेतकऱ्यांच्या फळबागा या पाण्याअभावी सुकून गेल्या. दरम्यान शासन स्तरावर याबाबत तात्काळ दखल घेऊन फळबागा वाचविण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

loss of mosambi farm in jalna
Beed : राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष चंदुलाल बियाणींसह 17 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com