Water Crisis In Latur: पाणीटंचाईची लातूर जिल्हाधिका-यांनी घेतली गंभीर दखल, प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याचे दिले आदेश

जिल्हाधिका-यांच्या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात आणि लातूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान नाागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
latur collector varsha thakur orders to supply water in drought areas
latur collector varsha thakur orders to supply water in drought areasSaam Digital

- संदीप भाेसले

लातूर जिल्ह्याला पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यातूनच आता जिल्हाधिकारी ठाकूर यांनी पाणीटंचाईचा प्रश्न तीन दिवसात निकाली काढावा अशी सूचना पाणीटंचाईची बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे लातूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 मध्यम प्रकल्पांपैकी 5 मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. दुसरीकडे मांजरा धरणात देखील आता केवळ 0.30 टक्के इतकाच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळं दहा ते बारा दिवसाआड लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याची वेळ लातूर महानगरपालिकेवर आली आहे.

latur collector varsha thakur orders to supply water in drought areas
Success Story: किन्हाळा तांड्यात दिवाळी साजरी, दिव्यांग लक्ष्मी राठोडची एमपीएससीत बाजी; ग्रामस्थांनी वाजतगाजत काढली मिरवणूक

लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत पाणीटंचाई निवारण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात टँकर आणि खाजगी विहीर- बोर अधिग्रहण करून पाणीटंचाईचा प्रश्न तीन दिवसांत निकाली काढावा अशी सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पाणीटंचाईची बैठक घेत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना आणि लातूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान नाागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

latur collector varsha thakur orders to supply water in drought areas
Amravati Hit And Run Case: पुण्यानंतर अमरावतीतही हिट अँड रन, घटना सीसीटीव्हीत कैद; युवक पाेलिसांना का सापडेनात? नातेवाईकांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com