ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह 17 संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मल्टीस्टेटचे परळी मुख्यालय असताना देखील गुन्हा दाखल होत नसल्याने तमाम ठेवीदारांत संताप व्यक्त होत होता.
राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्ख संचालक मंडळ ठेवीदारांचे जवळपास 300 कोटी बुडवत बीड येथील परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करून पोबारा केल्याची संतापजनक घटना घडली. मेहनतीचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यामुळे तमाम ठेवीदारांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली हाेती.
आपल्या पैशांच्या मागणीसाठी राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखेत खेटा मारण्यास प्रारंभ केला. मात्र तरी देखील चंदुलाल बीयाणी यांच्यासह अख्ख्या संचालक मंडळ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरलं.
त्यानंतर मात्र मुख्य शाखेसह सर्व शाखांना कुलूप लावीत सर्वचजण फरार झाले. परिणामी बिभीषण मानाजी तिडके (राहणार नेहरू चौक, परळी) यांच्या फिर्यादीवरून 7 काेटी 53 लाख 29 हजार 968 रुपयांसाठी परळी शहर पोलिस ठाण्यात चंदुलाल बियाणी यांच्यासह 17 जणांवर गुन्हा नाेंदविण्यात आला.
यामध्ये बालचंद्र लोढा, अभिषेक बियाणी, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लड्डा, अशोक जाजू, सतीश सारडा, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, जगदीश बियाणी, व्ही बी कुलकर्णी, श्रीमती कांबळे , तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी व इतर सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.