संदीप भोसले
लातूर : लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे बहरले आहे. मात्र पिकावर आता कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनवर अळी पडल्याने ती पाने कुरतडत आहे. आता फुल लागण्याची वेळ आल्याने फुलांवर देखील कीड दिसून येत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदा सोयाबीनचे चांगले उत्पन्न येण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे. दरम्यान जिल्ह्यातील उदगीर, रेनापुर परिसरातील (Soyabean Crop) सोयाबीन पिकावर कीड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कवळ्या पिकावरील कीड रोगामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने पिकावर औषधाची फवारणी करावी; असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकरी संकटात
सोयाबीन पिकावर पडलेल्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी (Farmer) शेतकरी महागडी औषधी घेऊन फवारणी करण्याच्या तयारीत आहे. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्यानेच फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आळी पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.