Jalgaon News : जादा दराने कापूस बियाणे विक्री; पारोळा येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Jalgaon News : कापूस बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला २६ मे रोजी मिळाली होती
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : खरीप हंगामाची तयारी सुरु असताना शेतकरी कापसाचे बियाणे खरेदी करत आहेत. काही विक्रेते जादा दराने कापसाचे बियाणे विक्री करत आहेत. अशाच पारोळा तालुक्यातील कृषी विक्रेता जादा दराने बियाणे विक्री करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jalgaon News
Cotton Seeds Shortage : अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या बीटी बियाणांचा तुटवडा; एका शेतकऱ्याला मिळतात फक्त दोन पाकिटे

पारोळा येथील मे. गायत्री ऍग्रो एजन्सी येथे कापूस बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकाला २६ मे रोजी मिळाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक म्हणून एका शेतकऱ्यास दुकानावर पाठविले. येथे विक्रेत्याने ८६४ रुपयास मिळणारे कापूस पिकाचे कबड्डी वाण बाराशे रुपये किमतीस शेतकऱ्यास (Farmer) विक्री करताना रंगे हात पकडले.

Jalgaon News
Pimpri Chinchwad Crime : देशी कट्ट्याचा धाक दाखवून लुटमार; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सदर घटनेच्या आधारे आज २७ मेस पारोळा (Parola) पोलीस स्टेशन येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर सी. डी. साठे, विभागीय नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, मोहीम अधिकारी  विजय पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा दिनेश कोते, कृषी सहायक रोहित शिंदे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com