पारोळा (जळगाव) : पाऊस नसल्याने शेतात पिकविलेल्या पिकांना कसे वाचवायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. याच (Jalgaon) कारणाने विवंचनेतुन त्रस्त झालेल्या पिंपळकोठा येथील तरुण शेतकऱ्याने (Farmer) फवारणीचे औषध घेऊन जीवनयात्रा संपविली. (Maharashtra News)
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली आहे. यामुळे पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. यातूनच पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथील मोहन शंकर राठोड (वय २२) हा शुक्रवारी (१ सप्टेंबर) फवारणीसाठी गेला असता, त्याने पिकांची स्थिती पाहून फोनवर शेतातील पिके करपल्याचे सांगितले. यानंतर त्याने विषारी द्रव प्रश्न केले.
फोनवरच सांगितले
शेतातील पिके करपल्याचे सांगतांना कपाशीवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पिऊन घेतले, तुम्ही शेतात या; असे त्याने फोनवरच सांगितले. हे ऐकून नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मोहनला उपचारासाठी खासगी वाहनाने कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.