Maratha Reservation : लाठीचार्ज निषेधार्थ आमणापूर गाव बंद; मराठा समाजाच्या बंदला सर्वस्तरातून पाठिंबा

Sangli News : लाठीचार्ज निषेधार्थ आमणापूर गाव बंद; मराठा समाजाच्या बंदला सर्वस्तरातून पाठिंबा
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

सांगली : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन उभारण्यात आले आहे. मात्र जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आंदोलकांवर पोलिसांनि लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलन आणखीनच चिघडले असून जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आमनापूर गावात बंद पाडण्यात आला आहे. (Live Marathi News)

Maratha Reservation
Nagpur Crime News : कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर लाठीमारनंतर मराठा आंदोलन आणखी आक्रमक झाले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज रविवारी समस्त मराठा समाज आणि शिवप्रतिष्ठान आमणापूर यांच्यावतीने पुकारलेल्या आमणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Maratha Reservation
Bhandara News: कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; दोन तास चालला ड्रामा

सकाळपासून जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ संपुर्ण आमणापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सकाल मराठा समाज व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सकाळी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र जमले. यावेळी जालना घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज यापुढे संघटीतपणे लढत राहणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com