जळगाव : रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. यात मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्याने साडेसात एकर क्षेत्र असलेल्या शेतात तेरा हजार केळीची (Banana Crop) लागवड केली होती. परंतु यावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या शेतकऱ्याने सर्व केळी काढून फेकली आहे. (Tajya Batmya)
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील भाऊराव पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात जून महिन्यात साडेसात एकर क्षेत्रात केळीचे तेरा हजार रोपांची लागवड केली होती. केळीचे रोप तीन महिन्याचे झाले असताना यावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव जाणवू लागला. केळीवरील या व्हायरसवर काही पर्याय नसल्याने या (Farmer) शेतकऱ्याने लागवड केलेली तेरा हजार केळीची खोडे शेतातून काढून टाकले आहेत.
मोठे आर्थिक नुकसान
आधीच शेतकरी केलेला भाव नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यातच वादळी वाऱ्याने शेतात आलेली केळीचे झाडे उन्मळून पडले आहेत. आता या सीएमव्हीच्या प्रादुर्भाव आल्याने सर्व रोप उपटावी लागली आहेत. यावर केलेला खर्च आता भरून निघणार नाही. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यावरती आत्महत्येचे संकट उभा राहिल्याचं शेतकरी यांनी बोलून दाखवलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.