संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ६ शेतकऱ्यानी आपली जीवनयात्रा संपवली आहे. अतिवृष्टीमुळे (Yavatmal) शेतातील पिके खरडून गेली आहेत. यामुळे आता हातात काहीच येणार नाही; मग जगायचे कसे, या विवंचनेतून (Farmer) शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हे धक्कादायक वास्तव आहे. (Maharashtra News)
यवतमाळ तालुक्यातील जामवाडी गावातील तरुण अल्पभूधारक शेतकरी नितीन पाने याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीनवर बचत गट सहसरकारी बँकेचे कर्ज होते. त्याचे ३ एकर शेत हे गावातील नाल्यालगत असल्याने अतिवृष्टीमुळे त्याचे शेत खरडून गेले होते. त्यातही त्याने हिम्मत न हरता पुन्हा शेती तयार केली आणि आपल्या शेतात कर्ज काढून कपाशी व तुरीची लागवड केली. मात्र शेत खरडून गेल्याने जमिनीचा पोत घसरला होता. त्यात घेतलेले पीक हे निकामी झाले. त्यामुळे तो सतत विवंचनेत होता. बँकेचे कर्ज, आईचा उपचार या सगळ्याचा विचार करत त्याने शेवटी मृत्यूला कवटाळले. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने पाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नऊ महिन्यात दीड हजार आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्या २५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यातील नितीन भारत पाने (जामवाडी), प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.