Hingoli Unseasonal Rain : गारपिटीच्या तडाख्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हिंगोलीत फळबागा उद्धवस्त, अमरावतीत दोन बैलांचा मृत्यू

Hingoli Amravati News : हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून गारपीट व वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे.
Hingoli Unseasonal Rain
Hingoli Unseasonal RainSaam tv

संदीप नागरे/ अमर घटारे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. वादळी तडाखा व गारपिटीमुळे (Hingoli) फळांचा जमिनीवर सडा पडला होता. तर गारपीटीच्या तडाख्यात सापडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर (Amravati) अमरावती जिल्ह्यात देखील वादळी तडाख्यात झाड पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Maharashtra News)

Hingoli Unseasonal Rain
Ahmednagar News : महाराष्ट्रातील या गावात हनुमंताचे नावही घ्यायला घाबरतात; जिथे होते फक्त दैत्याची पूजा

हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा व अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील राजुरा, मसोड, रामवाडी, जटाळवाडी कणका, चिंचोली, मुंडळ गावच्या शिवरातील आंबा व पपई फळाच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. तर राजुरा शिवारामध्ये गारांच्या तडाख्यात एका वयोवृध्द शेतकऱ्याचा मृत्यू (death) झाला आहे. देवराव बाभळे असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाकडून पंचनामा करण्याची मागणी होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli Unseasonal Rain
Onions Auction : व्यापारी-शेतकरी एकत्रित येत खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीत १० दिवसांपासून बंद आहे लिलाव

अमरावती वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान
अमरावती
: हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून गारपीट व वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे. यामध्ये मध्यरात्री जिल्ह्यातील रामा साऊर या गावात अनेक घराची छप्पर उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य सुद्धा पावसात भिजल्याने खराब झाले आहे. सोबतच गुरांच्या अंगावर झाडं पडून दोन बैलांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व आम्हाला मदत करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com