नव्या हळदीची आवक सुरु झाल्यानंतर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या हळदीला चांगला दर मिळत होता. मात्र (Hingoli) हिंगोलीच्या सेनगाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हळदीचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) गोंधळ घालण्यास सुरवात केली. यानंतर येथील खरेदी देखील बंद पाडली आहे.
हिंगोलीच्या सेनगाव बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) हजारो क्विंटल हळद घेऊन शेतकरी विक्रीसाठी आले होते. हळदीला सुरवातीला १२ हजाराच्या वर दर मिळाला होता. त्यानुसार आता हळदीला पंधरा ते सतरा हजार रुपयांचा भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. असे असताना बाजार समितीत हळद (Turmeric) विक्रीसाठी आणल्यानंतर दर पडून केवळ १३ ते १४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने हळद खरेदी करणे सुरू केले. यामुळे शेतकऱ्यांनी यास विरोध करत गोंधळ घातला. (Maharashtra Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी हळद घेऊन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या मालाचे अपेक्षित दर न देता हळदीचे भाव पाडले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गोंधळ घालत मालाची खरेदी बंद पाडली. यामुळे बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.