Hingoli News: माल खरेदी करून शेतकऱ्यांना दिले बोगस धनादेश; वसमत बाजार समितीत अकरा शेतकऱ्यांची फसवणूक

Hingoli News : माल खरेदी करून शेतकऱ्यांना दिले बोगस धनादेश; वसमत बाजार समितीत अकरा शेतकऱ्यांची फसवणूक
Vasmat Bajar Samiti
Vasmat Bajar SamitiSaam tv
Published On

संदीप नागरे 
हिंगोली
: कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा माल खरेदी केला. दीड महिन्यांपासून मालाचे पैसे मिळाले नाही. यानंतर माळ खरेदी केलेल्या आडत व्यापाऱ्याने बोगस धनादेश शेतकऱ्यांना दिल्या प्रकार (Hingoli) हिंगोलीच्या वसमत बाजार समितीत समोर आला आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Vasmat Bajar Samiti
Karnataka Rajyotsava 2023 : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात अर्लट, महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांना नो एन्ट्री! कारण काय?

महाराष्ट्रात नावाजलेली बाजार समिती म्हणून वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bajar Samiti) ओळख आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशेने या बाजार समितीमध्ये हळद मालाची विक्री केली होती. मात्र विक्री केलेल्या मालाचे पैसे बाजार समितीसह खरेदी दाराकडून देण्यास टाळाटाळ होत आहे. आता या शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. विशाल चोपडे, विठ्ठल दहातोंडे त्यांच्यासह दहा ते बारा शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vasmat Bajar Samiti
Onion Theft: चोरट्यांचा कांद्यावर डल्ला; शेडमधून ८५ कांदा गोण्यांची चोरी

धनादेश दिलेल्या बँक खात्यात रक्कमच नाही 

धक्कादायक बाब म्हणजे वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी असलेल्या बालाजी कदम नावाच्या अडत व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केला होता. या मालाचे शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे धनादेश कदम यांनी दिले. मात्र कदम यांनी ज्या बँक खात्याचे धनादेश शेतकऱ्यांना दिले. त्यामध्ये रक्कमच नसल्याने बँकेने या शेतकऱ्यांना हे धनादेश परत पाठवले. हे धनादेश परत मिळताच शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत आडत व्यापारी फरार झाला होता. विशेष म्हणजे वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या ताब्यात आहे. मात्र या प्रकरणात आमदार चंद्रकांत नवघरे यांनी देखील ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com