Karnataka Rajyotsava 2023 : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात अर्लट, महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांना नो एन्ट्री! कारण काय?

Karnatak Rajyostava 2023 Date : १९५६ साली या दिवशी दक्षिण भारतातील कन्नड बोलणाऱ्या प्रदेशांना एकत्र करुन कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली होती.
Karnataka Rajyotsava 2023
Karnataka Rajyotsava 2023Saam TV
Published On

Karnataka Rajyotsava 2023 In Kannada :

कर्नाटक राज्य स्थापनेचा दिवस हा १ नोव्हेंबरला राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. १९५६ साली या दिवशी दक्षिण भारतातील कन्नड बोलणाऱ्या प्रदेशांना एकत्र करुन कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी लोकांना डांबल्यामुळे हा दिवस काही भागांमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जातो. अशातच बेळगावात महाराष्ट्रातील चार नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यामध्ये तीन मंत्री आणि एका खासदाराचा समावेश आहे. आयुक्त नितीश पाटील यांनी अधिकृत आदेशात महाराष्ट्रातील मंत्री शंभूराजा देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत प्रवेशबंदी केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. काळा दिवस का साजरा करतात?

महाराष्ट्र (Maharashtra) एकीकरण समितीच्या मतानुसार बेळगावी ही महाराष्ट्राचा भाग असून यानिमित्ताने काळा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे बेळगावाच्या (Belagavi) सीमावर्ती जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव कर्नाटकात विभागले गेल्यामुळे येथील लोक निषेधार्थ काळा दिवस साजरा (Celebrate) करतात.

Karnataka Rajyotsava 2023
Gaur Gopal Das On Success : आयुष्यात घवघवीत यश हवंय? गौर गोपाल दासांचा यशाचा हा फॉर्मूला लक्षात ठेवाच!

2. १९५६ मध्ये सुरु झाला होता कर्नाटक राज्योत्सव दिवस

१९५६ पासून दरवर्षी हा आजचा दिवस हा कर्नाटक स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दक्षिण भारतातील सर्व कन्नड नागरिकांना एकत्र करुन या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जगभरातील कन्नड लोक हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतात. सरकारद्वारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. यात राज्योत्सव पुरस्कार, सामुदायिक उत्सव, वाद्यवृंद, कन्नड पुस्तकाचे प्रकाशन केले जाते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते कर्नाटक राज्याचे अधिकृत ध्वजारोहणही केले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com