Drought : दुष्काळ जाहीर करा मागणी करत 'प्रहार'च्या पदाधिका-याने जत तहसीलदारांची गाडी फाेडली

declare jat drought taluka : अचानक घडलेल्या घटनेने प्रशासकीय कर्मचा-यांची धावपळ उडाली.
sangli, jat drought
sangli, jat droughtsaam tv
Published On

Sangli News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी (drought) तालुक्याच्या यादीत जत तालुका समाविष्ट नाही. त्यामुळे जत मधील नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज (बुधवार) जतच्या तहसीलदार (jat tahshildar) यांची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे. (Maharashtra News)

sangli, jat drought
Onion Price Drop : सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, दरात दीड हजार रुपयांची घसरण

सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शुक्रवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्वपक्षीय नेत्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले हाेते. यावेळी जत तालुक्याला दुष्काळ यादीत समावेश न केल्यामुळे उपाेषणकर्त्यांनी शासनाच्या आदेशाची होळी केली हाेती.

दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत सांगली जिल्ह्यातील खानापूर, मिरज, शिराळा, कडेगाव या तालुक्यांचा समावेश झाला आहे. जत तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी जतच्या तहसीलदार यांची गाडी फोडली. बागडे हे जत तालुका दुष्काऴी जाहीर करा अशी मागणी करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sangli, jat drought
Karnataka Security At Kognoli Toll Plaza : महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांना बेळगावात नाे एंट्री, जिल्हाधिका-यांचा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com