Shindkheda Heavy Rain
Shindkheda Heavy RainSaam tv

Shindkheda Heavy Rain : परतीच्या पावसाने नुकसान; पुराच्या पाण्यात संपूर्ण शेतच गेले वाहून

Dhule News : रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर कपाशीचे शेतच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
Published on

धुळे : परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजविला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी. नाल्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान तालुक्यातील कर्ले परिसरात पावसामुळे शेत वाहून गेले असून शेतकऱ्याचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

धुळ्याच्या (Dhule) शिंदखेडा तालुक्यातील कर्ले या गावात रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर भिकन देवरे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात कपाशीची शेती शेजारच्या नाल्यात धसल्याने वाहून गेली आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर कपाशीचे शेतच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या कपाशीच्या पिकासह शेतात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Shindkheda Heavy Rain
Maharashtra Politics : अमित शहा गुजरातमधून आलेले गांडा भाई; संजय राऊतांची जहरी टीका, फडणवीसांनाही सुनावलं

भरपाईची मागणी 
पावसाळ्यात सुरवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. अशात परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे आता मदतीची हाक दिली जात असून, कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com