Kharif Crop Loan : खरीप हंगाम पीक कर्जावर शून्य टक्के व्याजाची सवलत; धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचा निर्णय

Dhule News : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४- २५ या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेतली आहे.
Dhule Nandurbar Bank
Dhule Nandurbar BankSaam tv

धुळे : आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार (Dhule) धुळे- नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जावर शून्य टक्के व्याज दराची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) निश्चितच दिलासा मिळणार आहे. (Breaking Marathi News)

Dhule Nandurbar Bank
Sambhajinagar Corporation : १ एप्रिलपासून खुले भूखंड, प्लॉटला लागणार कर; संभाजीनगर मनपाचा निर्णय

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२४- २५ या कालावधीत नवीन पीक कर्ज (Crop Loan) वाटपाची मंजुरी घेतली आहे. या पीक कर्ज वाटपाच्या तयारीला वेग दिला असून ३० मार्च २०२४ पूर्वी पीक कर्ज परत फेडीचे आवाहन देखील बँकेने (Bank) केले आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेमार्फत वैयक्तिक पीक कर्ज घेणाऱ्या सर्व सभासद, सर्वसामान्य सभासदांना बँकेतर्फे नवीन पीक कर्जाबाबत माहिती दिली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Nandurbar Bank
Washim Police : वाशीम पोलीस ॲक्शन मोडवर; नाकाबंदी करत वाहनांची तपासणी, २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

१० एप्रिलपासून वाटपास सुरवात 
येत्या (Kharif Season) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जावर शून्य टक्के दराने व्याज सवलत देण्याचे निश्चित केले आहे. तसेच १० एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्याविषयी धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com