Washim Police : वाशीम पोलीस ॲक्शन मोडवर; नाकाबंदी करत वाहनांची तपासणी, २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Washim News : पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ पोलीस अधिकारी व १७८ पोलीस अंमलदार व ५९ होमगार्ड यांनी हे ऑपरेशन राबविले.
Washim Police
Washim PoliceSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिस प्रशासनातर्फे विशेष ऑपरेशन ऑल आऊट, कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. २० मार्चच्या रात्री (Washim) वाशिम, मंगरूळपीर व कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलीस (Police) स्टेशनअंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच नाकाबंदी करत वाहनांची तपासणी देखील करण्यात आली. (Latest Marathi News)

Washim Police
Gondia Water Crisis : गोंदिया शहरात पाणी प्रश्न; खड्डा करून भरतात पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा योजना ठरतेय कुचकामी

वाशीम पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण ५३ निगराणी बदमाश, १२ तडीपार आरोपी, ३५ रेकॉर्डवरील गुन्हेगार, १३ गुन्हेगारांचे बेडे, वस्त्या व झोपडपट्ट्या तपासण्यात आल्या. त्याचबरोबर ४१ व स्टॅडिंग वारंटचे आरोपी तसेच ३८ हॉटेल व धाब्यांची तपासणी केली. जिल्हाभरात १३ ठिकाणी नाकाबंदी करून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लहान- मोठे वाहने मिळून एकूण ६७८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.  पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ पोलीस अधिकारी व १७८ पोलीस अंमलदार व ५९ होमगार्ड यांनी हे ऑपरेशन राबविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Washim Police
Sambhajinagar Corporation : १ एप्रिलपासून खुले भूखंड, प्लॉटला लागणार कर; संभाजीनगर मनपाचा निर्णय

२५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

जिल्हाभरात (Lok Sabha Election) एकाच रात्रीमध्ये ६ शस्र अधिनियम कारवाया करण्यात आल्या. तसेच दारूबंदी अधिनियम अन्वये एकूण २६ कारवाया करत ६ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करत नष्ट करण्यात आला. शिवाय संशयितरित्या फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली. जानेवारीपासून आजपावेतो सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५० पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com