gondia police fine 7 thousand vehicles collected 35 lakhs in 80 days sml80
gondia police fine 7 thousand vehicles collected 35 lakhs in 80 days sml80saam tv

Gondia : वाहतुकीचे नियम पाळा! 80 दिवसांत 7 हजार वाहनधारकांवर गाेंदिया पाेलिसांची कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल

गोंदिया जिल्ह्यात वाहतुकी संदर्भात अनेकवेळा जागृती करण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले गेले.
Published on

- शुभम देशमुख

Gondia :

गाेंदिया जिल्ह्यात विना हेल्मेट प्रवास करण्या-यांवर आणि वाहतुकीच्या नियमांची पायमल्ला करणा-यांवर गोंदिया पाेलिसांची (gondia police) करडी नजर आहे. गाेंदिया वाहतूक पोलिसांनी 80 दिवसांत 7 हजार जणांवर कारवाई करीत 35 लाखांचा दंड वसूल केले आहे. (Maharashtra News)

गोंदिया जिल्ह्यात वाहतुकी संदर्भात अनेकवेळा जागृती करण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु अद्यापही गोंदिया जिल्ह्यातील नागरीक हेल्मेट आणि सीटबेलट बाबत तितके गंभीर नसल्याचे समाेर आले आहे.

gondia police fine 7 thousand vehicles collected 35 lakhs in 80 days sml80
Buldhana: चिखली गौणखनिज प्रकरण, 4.13 कोटींचा दंड : तहसीलदार संतोष काकडे

गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, बुलेटच्या सायलेन्समध्ये बदल करणे या प्रकारांवर कारवाई केली. पाेलिसांनी जानेवारी ते मार्च या कालावधीत सुमारे 7 हजार वाहनांवर कारवाई करीत 35 लाख रुपयांचा दंड वसूल केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांच्या फक्त कारवाई करणे हा हेतू नसून जनसामान्यांमध्ये जनजागृती होऊन त्यांनी हेल्मेटचा आणि सीटबेल्ट चा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे वाहतूक पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

gondia police fine 7 thousand vehicles collected 35 lakhs in 80 days sml80
Kolhapur News : कोल्हापूरकरांनो! पाणी जरा जपून वापरा, राधानगरीसह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात हाेतेय घट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com