Gondia Water Crisis : गोंदिया शहरात पाणी प्रश्न; खड्डा करून भरतात पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा योजना ठरतेय कुचकामी

Gondia News : कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. जवळपास २५ हजार नळ ग्राहकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दप्तरी नोंद आहे.
Gondia Water Crisis
Gondia Water CrisisSaam tv
Published On

शुभम देशमुख 
गोंदिया
: गोंदिया शहराला लागून फुलचूर भागातील आंबाटोली परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Gondia) याठिकाणी अक्षरशः नागरिक खड्ढे करून पिण्याचे पाणी भरत आहेत. या भागात पाण्याची पातळी खाली (Water Crisis) असल्याने लोकांना पिण्याकरता मुबलक असे पाणी मिळत नसल्याचे वास्तव पाहण्यास मिळत आहे. (Maharashtra News)

Gondia Water Crisis
Parbhani News : मराठा आंदोलनकर्त्यांनी अडविल्या पुढाऱ्यांच्या गाड्या; महाविकास आघाडीच्या संवाद बैठकीदरम्यान घोषणाबाजी

गोंदिया शहरात २१ प्रभाग असून यामध्ये ४२ वॉर्डचा समावेश आहे. या वार्डातील नळधारक कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणी पुरवठा केला जातो. जवळपास २५ हजार नळ ग्राहकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दप्तरी नोंद आहे. असे असताना मागील वर्षापासून पाणीपुरवठा (Water Supply) योजनेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. कधी दुषित पाणी, कधी पाणी पुरवठ्यात खंड ही नित्याची बाब झाली आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून पाण्याची नितांत आवश्यकता असताना पाणी पुरवठ्यातील खंड शहरवासींना जिव्हारी येत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia Water Crisis
Chatrapati Sambhajinagar News : गॅस गळती प्रकरणात मनपा वसूल करणार ९ लाख; एचपीसीएल कंपनीला बजावली नोटीस

हंडाभर पाण्यासाठी भटकंती 

इतकेच नाही तर अंबाटोली परिसरातील महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने घागर भर पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात मागील एक वर्षापासून पाण्याची समस्या असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमाने पुरवलेली पाईपलाईन मधील पाण्याची पातळी खाली असल्याकारणाने खड्डा करून त्यातून पिण्याकरता पाणी भरावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com