रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात १ फेब्रुवारीला झालेल्या गॅस गळती झाली होती. या गॅस गाळातील कारणीभूत असणाऱ्या एचपीसीएल (Sambhajinagar) या कंपनीला जबाबदार धरून या कंपनीकडून आता मनपा ९ लाख रुपये वसूल करणार आहे. या संदर्भात मनपाने नोटीस देखील बजावली आहे. (Tajya Batmya)
छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील सिडकोजवळ एचपीसीएल कंपनीच्या टँकरमधून गॅस गळती झाली होती. गॅस गळती झाल्यामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. (Gas) गॅस गळती झाल्यानंतर मनपाच्या मनुष्यबळाचा वापर आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला होता. दरम्यान या घटनेमुळे मनपा आणि पोलीस (Police) प्रशासनाकडून जवळपास १२ ते १३ तास रेस्क्यू ऑपरेशन चालविण्यात आले होते. यामुळे संभाजीनगर शहरातील मोठा अनर्थ टळला होता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लागलेला खर्च करणार वसूल
महापलिकडून राबविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी महापालिकेने आपली यंत्र सामुग्री व मनुष्यबळाचा वापर केला होता. यासाठी सुमारे ९ लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्यामुळे हा खर्च वसूल करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून एच.पी.सी.एल कंपनीला ९ लाख रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.