बालाजी सुरवसे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून सातत्याने मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीवर आला होता. अशात सुरु असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे शेतात काढणीवर आलेले (Soyabean Crop) सोयाबीन. मका पीक काढून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन काढुन शेतातच ठेवले आहे. तर काहींनी कापून ठेवला आहे. मात्र पावसामुळे मोठे नुकसान झाल आहे. दरम्यान १६ मंडळात अतिवृष्टी झाली असल्याने ३ लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी सुचना दिल्या आहेत. (Dharashiv News) यामध्ये सर्वांच्या शेतात पंचनामा होणार नसुन नमुना सर्वेक्षण होणार आहे; अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली.
१२०० कोटींचा फटका
अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन खराब होण्याची शक्यता वर्तविली जात असून शेतकऱ्यांना अंदाजे १२०० कोटीचा फटका बसणार आहे. तर असाच पाउस सुरू राहीला तर नुकसानीत वाढ होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.