बीड : खरिपाच्या हंगामात लागवड करण्यात आलेल्या कांद्याची काढणी करण्यात आल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू लागला आहे. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दरम्यान बाजार समितीत कांद्याला ४५ रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मागील १५ दिवसांखाली (Onion Price) झालेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. परंतु कांद्याची योग्य साठवणूक करून बाजार समितीत चांगला दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बाजार समितीमध्ये कांदा आणला जातो आहे. आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची मोठी आवक होत आहे.
दरम्यान पहिल्याच दिवशी कांद्याचा लिलाव झाला असता सरासरी ४५ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला आहे. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची निर्यात दुबई, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यासह परराज्यात सुरू आहे. यंदा पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले असून उत्पदनात घट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र कांद्याला सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीप पिकांचे काही प्रमाणत नुकसान झाले असताना कांद्याने मात्र शेतकऱ्यांना आधार दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.