हिवाळ्यात गोड खावंसं वाटत असेल, तर झटपट तुपाचा शिरा बनवा. हा पदार्थ लवकर बनवा आणि खूप चवदार असतो.
तुपाचा शिरा बनवण्यासाठी रवा, ड्रायफ्रूट्स, दूध, पाणी, साखर किंवा गूळ, केळ, वेलची पूड, केशर इत्यादी साहित्य लागते.
तुपाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम केशर गरम दुधामध्ये भिजत घालून ठेवा. यामुळे रव्याला चांगला रंग आणि स्वाद येतो.
आता गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप टाकून रवा व्यवस्थित भाजून घ्या. रवा हलका गोल्डन झाला की गॅस कमी करा.
रवा भाजल्यावर त्यात एक केळ कापून टाका. म्हणजे तुपाचा शिरा मस्त प्रसादाचा शिरा बनेल. तुम्ही यात आवडीनुसार अजून पदार्थ टाकू शकता.
त्यानंतर गरम दूध टाकून सतत ढवळत रहा. जेणेकरून शिऱ्याच्या गुठळ्या होणार नाही.
रवा व्यवस्थित शिजल्यावर त्यात गूळ किंवा साखर घाला. तुम्हाला गोड कमी हवे असेल तर आवर्जून गुळाचा वापर करा.
शेवटी यात वेलची पूड, दुधात घातलेले केशर आणि ड्रायफ्रूट्स टाका आणि २-३ मिनिटांत गॅस बंद करा.