Shruti Vilas Kadam
लवकर जेवण केल्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि फुगल्यासारखे वाटणे कमी होते.
जेवण आणि झोप यामध्ये योग्य अंतर ठेवल्याने शरीर हलके राहते आणि झोप गाढ लागते. अनिद्रा किंवा बेचैनी कमी होण्यास मदत होते.
लवकर रात्रीचे जेवण केल्याने शरीरातील कॅलरी बर्निंग प्रोसेस सुधारते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता कमी होते आणि मेटाबॉलिझमही चांगले राहते.
उशीरा जेवण केल्यास ब्लड शुगर अचानक वाढू शकते. पण वेळेवर जेवल्यास शुगर लेव्हल नियंत्रित राहते, जे डायबेटीस टाळण्यासाठीही फायदेशीर आहे.
समयावर जेवण घेतल्याने शरीरातील हार्मोन्स नीट कार्य करतात. ताण-तणावाची पातळी कमी होऊन शरीर रिलॅक्स राहते.
लवकर जेवण केल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित राहतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
रात्री अन्न योग्य प्रकारे पचल्याने सकाळी उठल्यावर शरीर ऊर्जावान वाटते. आलस्य, थकवा किंवा भारीपणा जाणवत नाही.