Shreya Maskar
दालचिनी काढा बनवण्यासाठी दालचिनी, किसलेले आले, पाणी, काळी मिरी, मध, लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
दालचिनी काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.
पाणी उकळल्यावर त्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.
काढा ८-१० मिनिटे मंद आचेवर उकळवून घ्या. हा काढा आरोग्यास खूप फायदेशीर आहे.
आता काढा एका ग्लासमध्ये काढून गाळून घ्या. त्यानंतर यात मध आणि लिंबाचा रस घाला.
हिवाळ्यात या काढ्याचे सेवन दिवसातून १ वेळा करा. यामुळे सर्दी -खोकला होत नाही.
दालचिनी काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते.
दालचिनी काढ्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे छातीमधील जळजळ कमी होण्यास मदत होते. कफ कमी होण्यास मदत होते.