Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून मटार हलवा बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. हिरवागार मटार हलवा तुमच्या पोटाला थंडावा देईल.
मटार हलवा बनवण्यासाठी मटार, मीठ, सोडा, तूप, ड्रायफूट्स, बेदाणे, जायफळ, चारोळी, वेलची पावडर, खवा, गूळ इत्यादी साहित्य लागते.
मटार हलवा बनवण्यासाठी मटारचे दाणे पाणी आणि मीठ टाकून उकळवून घ्या. जास्त कच्चे राहणार नाही, याची काळजी घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून गूळ विरघळून घ्यावा आणि मटारचे दाणे मिक्सरमधून जाडसर वाटावा. मटारमध्ये थोडे पाणी देखील टाकू शकता.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप घालून ड्रायफूट्स परतून घ्या. यात मटारचे वाटलेले मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. मटार पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
या पॅनमध्ये विरघळलेला गूळ, खवा, सुकामेवा घालून एकजीव करा. गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता.
शेवटी चारोळी, जायफळ आणि वेलची पूड घालावी. जेणेकरून मटार हलवा अधिक स्वादिष्ट होईल. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ टाकू शकता.
मटार हलवा थंड अधिक टेस्टी लागतो. त्यामुळे त्यात थोड दूध टाकून तुम्ही तो फ्रिजमध्ये थंड करायला ठेवून द्या.