Shreya Maskar
मक्याची भाकरी बनवण्यासाठी मक्याचे पीठ, गरम पाणी, मीठ, धणे पावडर, ओवा आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
मक्याची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मक्याचे पीठ, धणे पावडर, ओवा आणि मीठ सर्व एकत्र करून घ्या.
यात कोमट पाणी घालून पीठ मऊ मळून घ्या. पीठ मळल्यावर १० मिनिटे बाजूला ठेवून द्या. यावर थोडे तूप लावा.
तयार पीठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर वाटीच्या मदतीने गोलसर आकारात पसरवा. म्हणजेच वाटीच्या मदतीने पीठाला आकार द्या.
गरम तव्यावर तूप टाकून मक्के की रोटी दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करून घ्या. 'मक्के की रोटी'ला मक्याची भाकरी किंवा चपाती असेही म्हणतात.
तुपामुळे रोटी अधिक खुसखुशीत आणि खायला मऊ होते. लक्षात ठेवा रोटी मंद आचेवर भाजा. जेणेकरून त्यातील पोषक घटक राहतील.
मक्के की रोटी सरसों का सागसोबत खूप चविष्ट लागतो. हॉटेलमध्ये हा पदार्थ खूप खाल्ला जातो.
मक्याची चपाती फाटू नये चांगली मऊ आणि फुगलेली व्हावी म्हणून पीठ मळताना त्यात तूप आणि पाण्याचे योग्य प्रमाण घ्या.