Shreya Maskar
हिवाळ्यात जेवणासोबत खाण्यासाठी खास मुरंबा बनवा. रेसिपी आताच नोट करा. यामुळे जेवताना आंबट-गोड चव चाखायला मिळेल.
आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी आवळा, साखर, पाणी, लवंग, वेलची, हळद पावडर, काळी मिरी, चिमूटभर मीठ इत्यादी साहित्य लागते.
आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा नीट धुवून स्वच्छ करा आणि नंतर त्याचे तुकडे करून घ्या. जेणेकरून तो चांगला शिजेल.
एका पॅनमध्ये पाणी घालून त्यात आवळा उकळवायला ठेवा. आवळ्याचा रंग बदलू लागल्यावर आवळा ५-१० मिनिटे उकळा.
आवळा थंड झाल्यावर त्यामधील बिया काढून टाका. जेणे करून मुरंबा रसरशीत बनेल. मुरंबा बनवताना आवळ्यांची निवड चांगली करा.
एका पॅनमध्ये पाणी आणि साखर टाकून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत चांगले उकळा. यामुळे मुरंबा अधिक चवदार होईल.
साखर चांगली विरघळल्यावर त्यात की त्यात लवंग, वेलची, काळी मिरी आणि मीठ घाला. मीठ आणि साखरेचे प्रमाण योग्य घाला.
शेवटी यात उकडलेला आवळा घालून 20-30 मिनिटे मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले शिजू द्या. त्यानंतर तयार मुरंबा हवाबंद काचेच्या डब्यात ठेवून द्या.