Shreya Maskar
थंड वातावरणात अनेकांना गरमागरम चहा प्यायला खूप आवडतो. त्यामुळे घरीच टपरीवर मिळतो तसा फक्कड आल्याचा चहा बनवा.
आल्याचा चहा बनवण्यासाठी आलं, चहा मसाला, साखर, वेलची, दूध, पाणी आणि सुंठ पूड इत्यादी साहित्य लागते.
आल्याचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पातेल्यात एक कप पाणी घ्या. त्यात उकळलेले दूध टाका.
दूध उकळल्यावर त्यात चमचाभर चहा मसाला घालून आल्याची पेस्ट टाका.
चहाला चांगली उकळी आल्यावर त्यात चहा मसाला, वेलची पूड, साखर घालून २-३ मिनिटे तसेच ठेवून द्या.
शेवटी चहामध्ये सुंठ पूड घालून २ मिनिटांत गॅस बंद करा.
गरमागरम आल्याचा चहासोबत खुसखुशीत बिस्किटे खा. फक्त १० मिनिटांत टपरीवर मिळतो तसा फक्कड आल्याचा चहा तयार होईल.
आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला यांवर आराम मिळतो. तसेच हिवाळ्यात शरीराल ऊब मिळते. हिवाळ्यात आल्याचा चहा आरोग्यवर्धक आहे.