Shreya Maskar
नेहमीची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर गावाकडे बनवतात तशी भरली वांगी बनवा. रेसिपी अगदी सिंपल आहे.
गावरान स्टाइल वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. यात थोडे तीळ भाजून घ्या. शेंगदाण्याची सालं काढून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, मिरची, जिरे आणि सुक्या खोबऱ्याचे काप टाकून पेस्ट बनवा. पेस्ट जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दाणे आणि तीळ जाडसर वाटून घ्या. जेणेकरून भाजीची चव आणखी वाढेल.
दोन्ही मिश्रण एका बाऊलमध्ये चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. तुम्ही मिश्रणात अधिक पदार्थ देखील टाकू शकता. जे तुम्हाला आवडतात.
वांगी स्वच्छ धुवून मध्यभागी कापून घ्या. जास्त मोठी चिर करू नका. आता वांग्यात तयार मसाला पूर्ण भरून घ्या.
पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. यात भरलेली वांगी घालून चांगली परतून घ्या.
भाजीला एक उकळी आल्यावर यात मसाला, हळद, हिंग घालून चांगले परतून घ्या. गरमागरम भाजीचा भाकरी आणि भातासोबत आस्वाद घ्या.