Shreya Maskar
हॉटेलमध्ये मिळतो तसा परफेक्ट खरवस घरीच बनवा. पारंपरिक रेसिपी आताच नोट करा. तुमच्या घरातील लोकांना हा पदार्थ खूप आवडेल.
खरवस बनवण्यासाठी दही, कॉर्नफ्लोर, दूध, साखर, वेलची पूड, गूळ आणि तूप इत्यादी साहित्य लागते. ही एक पारंपरिक रेसिपी आहे.
खरवस बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये दही घालून कॉर्नफ्लोर मिक्स करा. कॉर्नफ्लोरच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
या मिश्रणात दूध, गूळ, वेलची पावडर घालून साहित्य एकजीव करा. सर्व रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
एका स्टीलच्या भांड्याला तूप लावून ग्रीस करा. जेणेकरून तयार मिश्रण भांड्याला चिकटणार नाही.
दुधाचे मिश्रण गाळून भांड्यात ओतून घ्या. त्यावर जायफळ किसून घाला. थोड्याच प्रमाणात जायफळ घाला.
स्टीमरच्या भांड्यात पाणी उकळवून त्यात खरवसाचे मिश्रण असलेले भांडे ठेवून द्या आणि चांगली वाफ काढा. ३०-४० मिनिटांनी खरवस छान शिजवून होईल
त्यानंतर खरवस फ्रिजमध्ये २-३ तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवा. खरवस सेट झाल्यानंतर खरवसाचे काप करा.