Shreya Maskar
रव्याचा मेदू वडे बनवण्यासाठी रवा, दही, पाणी, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता, कांदा, मीठ, बेकिंग सोडा, तेल इत्यादी साहित्य लागते.
रवा मेदू वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा, दही आणि थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या.
तयार पीठात मीठ, हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता आणि कांदा घालून मिक्स करा.
मिश्रण १५-२० मिनिटं झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलून येईल. मेदू वडा बनवण्यासाठी बारीक रव्याचा वापर करा.
आता या मिश्रणात बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करा. तुम्हाला पाहिजे असेल तर यात डाळीची पेस्ट देखील तुम्ही टाकू शकता.
पॅनमध्ये तेल चांगले गरम करून त्यात वडे गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्या. जास्तही वडे तळू नका नाहीतर वड्यांना कडू चव येईल. होतील.
सांबार आणि चटणीसोबत गरमागरम कुरकुरीत मेदू वड्यांचा आस्वाद घ्या. तुम्ही संडेला हा खास नाश्ता बनवा. लहान मुलांना खूप आवडेल.
रवा भिजवताना दही आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. नाहीतर मिश्रण बिघडते. तसेच वडा तळताना फुटतो.