Sweet Dish Recipe : वाटीभर बेसनापासून झटपट बनवा 'हा' गोड पदार्थ, रेसिपी आहे खूपच खास

Shreya Maskar

गोड पदार्थ

तुम्हाला घरीच एखादी मिठाई बनवायची असेल तर मैसूर पाक नक्की ट्राय करा. साहित्य आणि कृती आताच नोट करा. हा पदार्थ बनवायला सोपा आहे.

मैसूर पाक

मैसूर पाक बनवण्यासाठी बेसन, तूप, दूध, वेलची पावडर, साखर, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका.

मैसूर पाक साहित्य

मैसूर पाक बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅस मध्यम आचेवर ठेवून पॅन चांगला गरम करून घ्या. जेणेकरून पदार्थ नीट बनेल.

बेसन

पॅन गरम झाल्यावर बेसन गोल्डन फ्राय होईपर्यंत परता. दुसऱ्या पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवा.

साखर पाणी

यानंतर गरम पाण्यात साखर आणि दूध घालून साखरेचा पाक तयार करा. नंतर या पाकात भाजलेले बेसन घालून हळूहळू मिक्स करा.

वेलची पूड

बेसनाचा रंग बदलायला लागल्यावर त्यात वेलची पूड टाकून मिक्स करा. यामुळे मैसूर पाकला आणखी चव येईल.

मिश्रण सेट करा

बेसनला तेल सुटायला लागले की तयार मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून सेट होण्यासाठी काही वेळ ठेवून द्या.

ड्रायफ्रुट्स

शेवटी मिश्रणावर ड्रायफ्रुट्स घालून हलक्या हाताने दाबून घ्या. मैसूर पाकचे तुमच्या आवडीच्या आकारात कापा.

Peanut Thecha Recipe : चटपटीत शेंगदाण्याचा ठेचा, भाकरी-वरणभातासोबत मनसोक्त खा

Peanut Thecha Recipe | yandex
येथे क्लिक करा