Shreya Maskar
शेंगदाण्याचा ठेचा बनवण्यासाठी शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, तेल, कांदा, कोथिंबीर, आलं, मीठ, जिरे, हळद, हिंग, कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
शेंगदाण्याचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये शेंगदाणे परतून घ्या. शेंगदाणे जास्त भाजले जाणार नाही, याची काळजी घ्या.
शेंगदाण्याची सालं सुटायला लागली की, गॅस बंद करून शेंगदाण्याची सालं चांगली काढून घ्या. यामुळे ठेचा अधिक चवदार बनेल.
शेंगदाणे एका कपड्यात बांधून जाडसर पूड करा. तसेच तुम्ही खलबत्यात देखील शेंगदाण्याचा कूट करू शकता.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून मिक्स करा.
या मिश्रणात कोथिंबीर, चवीनुसार मीठ, किसलेले आलं, हळद, हिंग घालून परतून घ्या. तुम्ही यात आणखी काही पदार्थ टाकू शकता.
दुसऱ्या पॅनमध्ये थोडेसे तेल, लसणाचे मिश्रण, शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
गरमागरम भाकरीसोबत शेंगदाण्याचा ठेचा खा. हा पदार्थ तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल. हा पदार्थ घरातील सदस्यांना नक्की आवडेल.