Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून गाजर हलवा बनवा. हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. त्यामुळे हा गोड पदार्थ घरी बनलाच पाहिजे.
गाजर हलवा बनवण्यासाठी किसलेले गाजर, साजूक तूप, दूध, गूळ, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स आणि दूध पावडर इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात आवडीनुसार इतर पदार्थ देखील टाकू शकता.
गाजर हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून, सोलून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये चांगले किसून घ्या. लाल गाजरांची हलव्यासाठी निवड करा.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले गाजर गोल्डन फ्राय परतून घ्या. गाजर किसल्यावर पटकन पॅनमध्ये टाका. गाजर जास्त काळ किसून ठेवू नका.
नंतर या मिश्रणात गरम दूध घालून चांगले शिजवा. दूध आटल्यावर यात दूध पावडर टाका आणि मिश्रण एकजीव करा.
मिश्रणात चवीनुसार गूळ आणि वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. हलवा पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या.
शेवटी यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स कापून टाका आणि एक वाफ काढून घ्या. अशाप्रकारे चविष्ट गाजर हलवा तयार झाला.
गाजर हलवा तुमच्या घरातील सदस्यांना खूप आवडेल. तुम्ही टिफिनला देखील हा पदार्थ घेऊन जाऊ शकता. तसेत १०-१५ मिनिटांत रेसिपी तयार होते.