Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला खास गुजरात स्पेशल मेथी थेपला बनवा. अगदी सिंपल आणि चवदार रेसिपी आताच नोट करून घ्या.
मेथी थेपला बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मेथी, आलं-लसूण पेस्ट, ओवा, दही, हिरवी मिरची, गरम मसाला, हळद, गरम मसाला, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता.
मेथी थेपला बनवण्यासाठी बाऊलमध्ये सर्वप्रथम गव्हाचे पीठ घ्या. यात धुवून चिरून घेतलेली मेथी टाका. मिश्रण छान एकजीव करा.
त्यानंतर मिश्रणात आलं-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, ओवा, तिखट, गरम मसाला, हळद, दही घालून चांगले मिक्स करा. मेथीला सर्व मसाला नीट लागेल याची काळजी घ्या.
यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या. पीठ जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
कणिक मळून झाल्यावर पीठ मऊ होण्यासाठी त्याला तेल लावून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा. पीठ जितके जास्त मुरते तेवढा थेपला मऊ होतील.
शेवटी पिठाचे छोटे गोळे करून थेपला लाटून घ्या. पॅनमध्ये तूप टाकून थेपला खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
चविष्ट आणि हेल्दी मेथी थेपला दही, लोणचं किंवा कोथिंबीर चटणी, टोमॅटो सॉस यांच्यासोबत खा. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल.