Konkani Sweet Dishes : कोकण स्पेशल वडे; 'या' फळाचा करतात वापर, घरी एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

कोकण स्पेशल

चिबुड वडे हा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ आहे. 'चिबुड' (खरबूज) हे एक फळ आहे. जे आरोग्याला फायदेशीर असते. त्यापासून चवदार वडे बनवता येतात.

Sweet Dishes | yandex

चिबुड वडे

चिबुड वडे बनवण्यासाठी चिबुड (खरबूज), तांदळाचे पीठ, मीठ, साखर, तेल इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात साखरऐवजी गूळ देखील वापरू शकता.

Sweet Dishes | yandex

चिबुड

चिबुड वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम चिबुडचे पातळ काप करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

Sweet Dishes | yandex

तांदळाचे पीठ

एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ , मीठ आणि साखर घालून मिश्रण तयार करा. यात तुम्ही चिबुडाचे मिश्रण मिक्स करा.

Rice flour | yandex

वडे बनवा

आता पिठाचे घट्टसर मिश्रण बनवून घ्या. मिश्रणाचे छोटे गोळे करून वडे थापून घ्या. वडे जास्त मोठे बनवू नका.

Sweet Dishes | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात वडे गोल्डन फ्राय करा. वडे जळणार नाही याची काळजी घ्या.

Sweet Dishes | yandex

सांबार

कुरकुरीत चिबुड वड्यांचा सांबारासोबत आस्वाद घ्या. हा पदार्थ बनवायला अगदी सिंपल आहे. तसेच खाण्यासाठी चविष्ट आहे.

Sweet Dishes | yandex

गोड पदार्थ

कोकणात सणासुदीला आवर्जून चिबुड वडे हा गोड पदार्थ बनवला जातो. एक घास खाताच तुम्हाला गावाची आठवण येईल.

Sweet Dishes | yandex

NEXT : पनीर बिर्याणी अन् मटर पनीर खाऊन कंटाळलात? मग 'ही' चटपटीत रेसिपी एकदा ट्राय कराच

Paneer Recipe | yandex
येथे क्लिक करा...