Shreya Maskar
पनीरचे नेहमीचे पनीर बिर्याणी आणि मटर पनीर असे पदार्थ खाऊन कंटाळाला असाल तर झटपट पनीर शिमला मिरचीची भाजी बनवा.
पनीर शिमला मिरची मसाला भाजी बनवण्यासाठी पनीर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, तेल, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करून घ्या.
यात आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यानंतर यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
भाजीत आता हळद, तिखट आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. यात शिमला मिरचीचे तुकडे २-३ मिनिटे परतून घ्या.
मग यात पनीर आणि मीठ घालून हळूवारपणे मिक्स करा. भाजी ५-८ मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्या.
शिमला मिरची आणि पनीर चांगले शिजल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ काढून घ्या.
गरमागरम चपाती आणि भाकरीसोबत पनीर शिमला मिरची भाजी आस्वाद घ्या. हा पदार्थ तुमच्या घरातील सर्वांना आवडेल. मुलं मिनिटांत डीश फस्त करतील.