Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला झटपट दडपे पोहे बनवा. ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडेल आणि त्यांची पोटही भरेल.
दडपे पोहे बनवण्यासाठी पातळ पोहे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, टोमॅटो, काकडी, ओलं खोबरं, हळद, लिंबाचा रस, जिरं, मीठ इत्यादी साहित्य लागते.
दडपे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका ताटामध्ये पातळ पोहे घ्या. त्यावर थोडे पाणी शिंपडून पोहू मऊ करून घ्या.
यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी चिरून घाला. सर्व पदार्थ फ्रेश असतील याची काळजी घ्या.
यात किसलेले ओलं खोबरं पोह्यांमध्ये मिक्स करा. त्यानंतर कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करा.
शेवटी पोह्यांना फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये हिंग, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि लिंबू पिळा.
तयार फोडणी पोह्यांच्या मिश्रणावर टाकून सर्व एकजीव करून घ्या. कोकण प्रदेशात प्रामुख्याने दडपे पोहे बनवले जातात.
शेवटी पोहे एका ताटात काढून त्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा आणि पोह्यांचा आस्वाद घ्या.