Shreya Maskar
ऑफिसवरून थकून आल्यावर खाण्यासाठी झटपट भेळ पुरी बनवा. हा पदार्थ लहान मुलांना देखील खूपच आवडेल.
भेळ पुरी बनवण्यासाठी मुरमुरे, शेंगदाणे, कांदा, बटाटा, टोमॅटो, कैरी, शेव पापडी, कोथिंबीर, चाट मसाला, हिरवी मिरची इत्यादी साहित्य लागते.
भेळ पुरी बनवण्यासाठी भाजलेले मुरमुरे वापर करा. एका मोठ्या बाऊलमध्ये भाजलेले मुरमुरे घ्या.
त्यानंतर बाऊलमध्ये उकडलेला बटाटा मॅश करून टाका. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाका.
पुढे या मिश्रणात कच्ची करी, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, आंबट-गोड चटणी आणि भाजलेले शेंगदाणे घालून भेळ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
भेळ आणखी चटपटीत बनवण्यासाठी यात शेव-पापडी आणि फरसाण घाला. लिंबू पिळा.
शेवटी भेळमध्ये कोथिंबीर टाकून चटपटीत भेळ पुरीच्या गरमागरम चहासोबत आस्वाद घ्या.
तुम्ही भेळ पुरीमध्ये मक्याचे दाणे आणि डाळिंब देखील टाकू शकता. यामुळे भेळ आणखी चटपटीत होईल.