Shreya Maskar
ओट्स सूप बनवण्यासाठी ओट्स, गाजर, टोमॅटो, आले, कोथिंबीर, कोबी इत्यादी साहित्य लागते.
ओट्स सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून ओट्स चांगले भाजून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले आले आणि भाज्या परतून घ्या. यात ओट्स आणि वाटीभर पाणी घालून सूप चांगले चांगले शिजवा.
सुपाला उकळी आल्यावर गॅस बंद करून गरमागरम सुपाचा आस्वाद घ्या. हे सूप नियमित जेवणाच्या आधी प्या. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
ओट्स खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही.ओट्स पचनास मदत करतात आणि चयापचय दर सुधारते.
ओट्समुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ओट्समधील बीटा-ग्लुकन नावाचे फायबर रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी कमी करते. ज्यामुळे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.
ओट्समधील पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करतात. ओट्समध्ये असलेले फायबर आणि प्रथिने पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.