Aloo Matar Recipe : हॉटेलमध्ये बनवतात तशी 'मटार बटाटा भाजी', रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

Shreya Maskar

मटार बटाटा भाजी

मटार बटाटा भाजी बनवण्यासाठी कांदा, लसूण, हिरवा वाटाणा, नारळ, आलं, हिरवी मिरची, जिरं, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, तेल, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, कढीपत्ता, कोथिंबीर, पाणी, बटाटा, टोमॅटो इत्यादी साहित्य लागते.

Aloo Matar | yandex

हिरवा मटार

मटार बटाटा भाजी बनवण्यासाठी हिरवा वाटाणा रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये शिजवा. शिजवाना मटारमध्ये मीठ घाला.

Green Pea | yandex

कोथिंबीर

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूणच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याची पेस्ट बनवा.

Coriander | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, कढीपत्ता, दालचिनी, काळीमिरी, हिरवी मिरची, तमालपत्र आणि सुके मसाले घालून परतून घ्या.

Aloo Matar | yandex

बटाटा

त्यानंतर यात बटाट्याचे तुकडे, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि पाणी टाकून ग्रेव्ही बनवा. भाजीला छान उकळी काढा.

Potato | yandex

मटार

भाजीत आता उकडलेले मटार घालून चांगले एकजीव करा. ५-१० मिनिटे भाजीला चांगली वाफ काढून घ्या.

Peas | yandex

मीठ

शेवटी भाजीत चवीनुसार मीठ टाका. तुम्ही यात बारीक चिरलेला टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी देखील टाकू शकता.

Salt | yandex

खोबरं

ओल्या खोबऱ्याने भाजीला चांगले सजवा. तुम्ही वरून हिरवीगार कोथिंबीर देखील टाकू शकता.

Coconut | yandex

NEXT : महागडा 'प्लम केक' घरीच सिंपल पद्धतीने बनवा, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Plum Cake Recipe | yandex
येथे क्लिक करा...