Shreya Maskar
प्लम केक बनवण्यासाठी संत्र्याचा रस, क्रॅनबेरी , काळे मनुके, किशमिश, टुटी-फ्रुटी, ब्राऊन शुगर, बटर, व्हॅनिला इसेन्स, संत्र्याच्या सालांची पावडर, मैदा, कोको पावडर, दालचिनी पावडर, लवंग पावडर, जायफळ पावडर, बेकिंग पावडर, ड्रायफ्रुटस आणि दूध इत्यादी साहित्य लागते.
प्लम केक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये संत्र्याचा रस घेऊन त्यात क्रॅनबेरी, काळे मनुके, किशमिश, टुटी-फ्रुटी घालून मंद आचेवर हलके शिजवून घ्यावे.
बाऊलमध्ये बटर घेऊन त्यात बेकिंग पावडर आणि ब्राऊन शुग मिक्स करा.
मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, संत्र्याच्या सालांची पावडर, कोको पावडर, दालचिनी पावडर, लवंग पावडर, जायफळ पावडर आणि मैदा घालावा.
त्यानंतर मिश्रणात ड्रायफ्रूट्स, बेकिंग पावडरचे मिश्रण, दूध आणि संत्र्याच्या रसाचे मिश्रण टाकून सर्व नीट एकजीव करून घ्या.
तयार केकचे बॅटर केकच्या भांड्यात टाकून वरून ड्रायफ्रुटस, किशमिश आणि टुटी-फ्रुटी घाला.
४५-५० मिनिटांसाठी प्लम केक बेक करायला मायक्रोवेव्ह ठेवून द्या. केक जळणार नाही, याची खबरदारी घ्या.
बेकरीत मिळतो तास अगदी सॉफ्ट आणि चवदार प्लम केक खाण्यासाठी तयार आहे. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.