Amla Chutney Recipe: तोंडाची चव वाढवणारी आंबट- गोड आवळा चटणी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

आवळा

आवळा औषधी फळ आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. थंडीच्या दिवसात आवळा खाल्ला जातो. आवळ्याचे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.

Amla | istock

आबंट- गोड आवळा चटणी

आबंट- गोड आवळा चटणी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आवळा चटणी बनवू शकता.



Amla Chutney | yandex

साहित्य

आवळा चटणी बनवण्यासाठी आवळे, हिरवी मिरची, आलं- लसूण, मीठ, साखर, जिरे, मोहरी, हळद, हिंग, तेल हे साहित्य एकत्र करा.

Amla Chutney

आवळे स्वच्छ धुवून घ्या

आवळा चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आवळ्यामधील बिया काढा आणि आवळा बारीक किसून घ्या.

Amla | yandex

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे याची फोडणी द्या नंतर त्यात हळद, हिंग आणि हिरवी मिरची आलं - लसूण परतून घ्या.

Fodni

मीठ घाला

नंतर या तयार मिश्रणात बारीक किसलेला आवळा चवीनुसार मीठ आणि थोडी साखर मिक्स करा.

Excess salt

आवळा चटणी तयार

संपूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यत शिजवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी आवळा चटणी तयार करा.

Amla Chutney Recipe | google

next: Chana Bhel Recipe: चटापटीत चणा भेळ कशी बनवायची?

येथे क्लिक करा...