Manasvi Choudhary
संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही चटपटीत चणा भेळ ट्राय करू शकता.
चणा भेळ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
चणाभेळ बनवण्यासाठी उकडलेले चणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला, शेव हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी उकडलेले चणे एका भांड्यात घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
तयार मिश्रणात चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळून टाका. जर तुम्ही मुरमुरे वापरणार असाल तर तेही आताच घाला.
संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले चण्यांना व्यवस्थित लागतील.
अशापद्धतीने चटपटीत चणा भेळ सर्व्हसाठी रेडी होईल.