Manasvi Choudhary
मुळा ही एक औषधी भाजी आहे. अनेकजण कच्चा मुळा देखील खातात मुळा खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात मुळा भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.मुळ्याची भाजी, मुळा पराठे तसेच कोशिंबीर असे विविध पदार्थ मुळापासून बनवले जातात. मुळाच्या पानांचीही भाजी केली जाते.
मुळ्याची भाजी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहते यामुळे मधुमेह हा आजार होत नाही.
मुळ्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. मुळ्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने मुळव्याध कमी होतो. मुळ्याच्या भाजीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे सूज देखील कमी होते.
डोळ्यांच्या दृष्टी कमी असेल तर आहारात मुळ्याच्या भाजीचे सेवन केले पाहिजे मुळा खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
थंडीत शरीरात पाण्याची कमतरता कमी असते यामुळे मुळा भाजी खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.