Diabetes Control Diet google
लाईफस्टाईल

Diabetes Control Diet: डायबेटीज नियंत्रणात राहत नाहीये? मग आत्ताच आहारात करा या ४ डाळींचा समावेश

Blood Sugar Control: डायबेटीज रुग्णांनी योग्य आहार न घेतल्यास साखर वाढू शकते. फायबरयुक्त चणा डाळ, मूग डाळ, राजमा आणि हरभरा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धावपळीच्या जगात लोक पौष्टीक आहाराकडे कानाडोळा करताना दिसतात. लोकांना घरातलं ताजं अन्न बेचव वाटतं आणि बाहेरचे पदार्थ चवीला सगळ्यात भारी आहेत असं वाटतं. चवीत जरी फरक असला तरी बाहेरचं अन्न तुम्हाला तुमच्या नकळत संकटात टाकत असतं. इतकंच नाही तर याचा परिणाम डायबेटीज रुग्णांवर जास्त प्रमाणात होतो. त्यावर काय पर्याय आहेत? हे जाणून घेण्यासाठी पुढील लेख नक्की वाचा.

तुम्ही जे खाता त्यावर तुमचं शरीर काम करत असतं. जर तुमच्या पोटात पौष्टीक पदार्थ गेलेच नाही किंवा तुमच्या शरीरात एखाद्या पदार्थ जास्त गेला तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातच जे डायबेटीजचे रुग्ण आहेत. त्यांनी काही पदार्थ आवर्जून टाळले पाहिजेत. जसे की साखर ही संपूर्णपणे टाळली पाहीजे. याचसोबत आहारात काही डाळींचा आहार घेतला पाहिजे. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

डाळी आणि कडधान्यांमध्ये फायबर असतं, जे कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करतं. डॉक्टरांच्या मते, रोजच्या रोज फायबरयुक्त आहार घेतल्याने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि कोलन कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं आणि चयापचय क्रिया सुधारते.

तज्ज्ञांच्या मते, डाळींचं प्रमाण जास्त असलं तरी डायबेटिस रुग्णांच्या रक्तातली साखरेत अचानक वाढ होत नाही. कारण डाळींमधील फायबर आणि प्रथिनं साखर हळूहळू रक्तात मिसळण्यास मदत करतात. यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण जास्त चांगल्या पद्धतीने होतं. जे लोक मांसाहार करत नाहीत, त्यांच्यासाठी डाळी प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरतात.

चणा डाळ, राजमा, मूग डाळ आणि हरभरे यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे हे कडधान्ये डायबेटिस रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. चणा डाळीत प्रथिनं आणि फॉलिक अ‍ॅसिड असतात. त्यामुळे नवीन पेशी तयार होतात. राजमा पोषक घटकांनी भरलेला असतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. मूग डाळ ही हलकी आणि पचायलाही हलकी असते. वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठीही फायदेशीर आहे. हरभरा फायबरयुक्त असल्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि रक्तातली साखर नियंत्रणात येते. रोज योग्य प्रमाणात डाळी आणि कडधान्यांचा समावेश केल्याने डायबेटिस नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehandi For Hair Side Effects : केसांवर मेहंदी लावल्याने होणारे नुकसान तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Treaty of Purandar: छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पुरंदरचा तह काय होता?

Pune Politics: पुण्यात शिवसेना-भाजपची महायुती तुटली? अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

Government Job: सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

SCROLL FOR NEXT