Sakshi Sunil Jadhav
आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा लोक तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशाचीच वाट पाहत असतात. तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली जाते.
अशा परिस्थितीत मन खचण्याची शक्यता असते. मात्र चाणक्य म्हणतात, हाच काळ तुमच्या आत्मविश्वासाची खरी परीक्षा घेतो.
लोक तुमच्या पडण्याची वाट पाहत असताना, तुमच्यातील असलेली ताकद जागी होते. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणं आहे.
काही वेगळं करायचं ठरवलं की प्रश्न उपस्थित होतात. “तुमच्याकडून होणार नाही” अशा प्रतिक्रिया येतात, पण त्या दुर्लक्षित करून पुढे जाणं गरजेचं आहे.
तुमची क्षमता लोकांच्या बोलण्याने नाही, तर तुमच्या कष्टांनी, प्रयत्नांनी सिद्ध होते. दररोज केलेली छोटी प्रगतीही मोठ्या यशाकडे नेते.
टोमणे, टीका आणि नकारात्मक विचार मनाला त्रास देतात. मात्र त्याच टीकेचा उपयोग स्वतःला जास्त मजबूत करण्यासाठी करता येतो.
इतरांवर मात करण्यापेक्षा स्वतःच्या भीती, आळस आणि संभ्रमावर विजय मिळवणे हेच खरे यश असल्याचे चाणक्य नीती सांगते.
यशाचा मार्ग एकाकी असतो. मात्र हे एकटेपणच माणसाला आतून मजबूत बनवते आणि स्वतःला अधिक चांगले समजून घेण्याची संधी देते.
यश मिळाल्यानंतर अहंकार टाळून संयम आणि शांतता राखणे गरजेचे आहे. खरी जिंक तीच असते, जी माणसाला अधिक परिपक्व आणि उत्तम व्यक्ती बनवते.