Dementia Symptoms : मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं

Brain Nerve Damage: डोळ्यांमधील बदल मेंदूच्या आरोग्याचे संकेत देतात. रेटिना पातळ होणे डिमेंशिया व अल्झायमरचा धोका वाढवू शकते, त्यामुळे वेळेवर तपासणी महत्त्वाची आहे.
Brain Nerve Damage
Dementia Symptomsgoogle
Published On

माणसाला जिवंत राहण्यासाठी ह्रदयाच्या बरोबर मेंदूचीही आवश्यकता असते. जर या दोन्हीच्या कार्यात काही अडथळे आले की, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढत चालले आहेत. यामध्ये डिमेंशियाचा धोका झपाट्याने वाढताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या तज्ज्ञांना आढळला आहे. पुढे आपण या आजाराची लक्षणे जाणून घेणार आहोत.

डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश. या आजाराला मृत्यूचं सातवं कारण मानलं जात आहे. स्मृतिभ्रंश हा एकच आजार नसून तो एक सिंड्रोम आहे. म्हणजेच मेंदूशी संबंधित तितके गंभीर आजार आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. याचा परिणाम म्हणजे, व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि मानसिक स्पष्टता कमी होत जाते. काही रुग्णांच्या वागण्यातही बदल दिसून येतो.

Brain Nerve Damage
Blood Pressure: कोणत्या वेळी BP अचानक वाढतो? डॉक्टरांनीच दिली माहिती, वेळीच व्हा सावध

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, भारतात सध्या साडेआठ कोटींपेक्षा जास्त लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. त्यामुळे हा आजार आता वैयक्तिक मर्यादेत न राहता सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न बनला आहे. यामध्ये डोळ्यांमधून भविष्यात स्मृतिभ्रंश होईल की नाही हे ओळखता येऊ शकते.

फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डोळ्याच्या मागच्या भागात असलेली रेटिना भविष्यातील स्मृतिभ्रंशाचे संकेत देते. रेटिना ही डोळ्यांमधील अशी संवेदनशील ऊती आहे जी प्रतिमा टिपून त्या मेंदूपर्यंत पोहोचवते. ही ऊती नाजूक असते तिच्यात होणारे बदल थेट मेंदूच्या आरोग्याशी संबंधित असतात. ज्या लोकांची रेटिना पातळ असते. त्यांना अल्झायमर किंवा इतर प्रकारच्या डिमेंशियाचा धोका जास्त असतो.

दृष्टीसंबंधित मज्जातंतू हा मेंदूच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. त्यामुळे डोळ्यांमधील बदल हे मेंदूमधल्या बदलांचे हे संकेत असू शकतात. या आजारामुळे स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्यात गोंधळ होणे, बोलताना अडचणी येणे, शब्द चुकणे, निर्णय घेणे कठीण जाणे, मूडमध्ये बदल होणे, हालचाली मंदावणे आणि दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे डोळ्यांमधल्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून घेणे भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Brain Nerve Damage
Kidney: थंडीत केलेली १ चूक ठरते किडनी निकामी होण्याचं कारण, डॉक्टारांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com